कणकवलीत २८ ला पेन्शनरांची सभा

कणकवलीत २८ ला पेन्शनरांची सभा

Published on

कणकवलीत २८ ला
पेन्शनरांची सभा
कणकवली ः कणकवली पेन्शनर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) सकाळी दहाला शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित केली आहे. या सभेत तालुक्यातील सर्व निवृत्त कर्मचारी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. सभेमध्ये निवृत्तिवेतन विषयावर तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्या निवृत्तवेतनधारकांच्या पेन्शनविषयक वैयक्तिक तक्रारी किंवा शासनाकडील लाभ प्रलंबित असतील, त्यांनी आपल्या तक्रारी व मागण्यांचे पत्र लेखी स्वरूपात संघाकडे सादर करावे. तालुक्यातील सर्व निवृत्त पेन्शनधारकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
......................
कुणकेरी-कशेलवाडी
रस्ताकामाचा प्रारंभ
कुणकेरी ः येथील कशेलवाडी रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. १९) भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे संचालक गजानन गावडे, सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनील परब, ग्रामपंचायत सदस्य माधवी मेस्त्री व अंकिता सावंत, शक्तिकेंद्रप्रमुख बाळकृष्ण सावंत, बूथ अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह कृष्णा मेस्त्री, माजी सरपंच बाळा सावंत, प्रदीप सावंत, रवी सावंत, नाना सावंत उपस्थित होते. या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे कशेलवाडी परिसरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले.
---
मालवणात सोमवारी
पेन्शन अदालत सभा
मालवण : मालवण गटस्तरावर तिमाही पेन्शन अदालत सभा सोमवारी (ता. २९) सकाळी अकराला पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेस जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरून निवृत्त झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले आहे.
...................
आंदुर्ले येथे आज
पादुकांचे आगमन
कुडाळ ः आंदुर्ले-विराचे पाणी येथील पाटील-पाडगावकर परिवार यांच्या निवासस्थानी उद्या (ता. २४) सायंकाळी साडेपाचला वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्या श्री पादुकांचे आगमन होणार आहे. उद्या सायंकाळी साडेपाचला श्री पादुकांचे आगमन, रात्री सातला सायंपूजा, शांतिपाठ व आरती, साडेसातला नृसिंहवाडी येथील कीर्तनकार शरद घाग बुवा यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी (ता. २५) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com