रत्नागिरी- पुस्तके पाठवण्याचे आवाहन
माहेर साहित्यरत्न पुरस्कारासाठी
पुस्तके पाठवण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. २३ : समाजातील कवी, लेखकांच्या साहित्यकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीतील माहेर संस्था माहेर साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरव करणार आहे. त्यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन केले आहे.
साहित्यप्रकार स्वलिखित (मराठी, हिंदी, इंग्रजी), कवितासंग्रह, कथासंग्रह कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ललित लेखन, वैचारिक लेखसंग्रह आदी यातील योग्य पुस्तकाला पुरस्कार देण्यात येईल. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या पाच वर्षात प्रकाशित झालेली पुस्तके यासाठी ग्राह्य धरली जातील. ५ जानेवारीपर्यंत एका पुस्तकाच्या दोन प्रती कुरियर, पोस्ट किंवा प्रत्यक्ष भेट देऊन माहेर संस्था, १८/अ, समर्थनगर, तारवेवाडी, निवळी फाट्याजवळ, हातखंबा, ता. जि. रत्नागिरी, पिनकोड ४१५६१९ या पत्त्यावर पाठवाव्यात. विजेत्यांना माहेर संस्थेच्या संस्थापिका, सि. लूसी कुरियन यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम फेब्रुवारी-२०२६ मध्ये रत्नागिरीत आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती प्रकल्पप्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.

