सावंतवाडीला ‘ग्लोबल सिटी’ बनवू
12929
12930
सावंतवाडीला ‘ग्लोबल सिटी’ बनवू
नगराध्यक्षा श्रद्धा भोसले ः सावंतवाडीकरांचा विश्वास सार्थकी लावणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः सावंतवाडीकरांचे प्रेम आणि भाजपच्या जोरावर नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आले. आज खऱ्या अर्थाने या पदाच्या खुर्चीवर विराजमान होताना जनतेचा विश्वास सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. नगराध्यक्षा म्हणून आगामी पाच वर्षांत सावंतवाडी शहराला अधिक सुंदर बनवितांना एक ‘ग्लोबल सिटी’ म्हणून विकसित करू, असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी व्यक्त केला.
सौ. भोसले यांनी आज युवराज लखमराजे भोसले यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व सर्वच नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासाबाबत आपले व्हिजन व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘सावंतवाडी संस्थान म्हणून आमच्या राजघराण्याने या शहरासाठी फार मोठं योगदान दिलं आहे. आता लोकप्रतिनिधी या नात्याने राजघराण्याचे लोकसेवेचे ते व्रत कायम राखणार आहे. सावंतवाडी शहराला अधिक सुंदर व विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार. देशात व राज्यात महायुती आहे. त्यामुळे या ठिकाणीही आम्ही महायुती म्हणूनच काम करणार आहे.’
त्या पुढे म्हणाले, ‘सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे. एक वेगळी संस्कृती लाभली आहे. त्यामुळे या शहराची संस्कृती कायम राखत ‘एआय’सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अपेक्षित शहराचा विकास साधणार. आता सावंतवाडीचा विकास हे एकच ध्येय असून त्यासाठीच काम करणार आहे. विकासासोबतच शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील. लोकप्रतिनिधी या नात्याने सावंतवाडी पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे काम केले जाईल. कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्याही दूर केल्या जातील व त्यांच्या साथीने या शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल.’
--------------
फुलांच्या पायघड्यांनी स्वागत
नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी आज आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज व शिवरामराजे भोसले यांचा आशीर्वाद घेत पालिका सभागृहात प्रवेश केला. खास फुलांच्या पायघड्या घालत पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालिका अधिकारी, कर्मचारी वर्गाकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

