पारदर्शक, जलद सेवेला प्राधान्य द्या
swt2333.jpg
12941
सिंधुदुर्गनगरी : कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.
पारदर्शक, जलद सेवेला प्राधान्य द्या
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेः सिंधुदुर्गनगरीत ‘सुशासन सप्ताह’ कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा देणारा घटक या भूमिकेतून काम करताना जनतेची कामे तातडीने आणि पारदर्शकपणे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
लोकाभिमुख प्रशासन, जलद सेवा वितरण आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुशासन सप्ताह अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वराळे, आरती देसाई, वक्ते श्री वळंजू उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘‘आपण नागरिकांना कोणत्या सेवा देतो, त्या किती जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहेत, तसेच त्या अधिक प्रभावी कशा करता येतील, यावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास टिकवणे हे आपल्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर वेळेत निर्णय घेणे, हेच खरे सुशासन आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना कालमर्यादा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
श्री. वळंजू यांनी उपस्थितांना सुशासन याविषयी मार्गदर्शन केले. प्रशासनातील कामकाजाचा संदर्भ देत त्यांनी, नागरिकांचे प्रश्न विहित कालावधीत निकाली काढणे किंवा पुढील टप्प्यावर नेणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, याची जाणीव सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी वराळे यांनी प्रास्ताविक केले. राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

