लायन्स सेवा पुरस्कारांची घोषणा

लायन्स सेवा पुरस्कारांची घोषणा

Published on

rat२२p३.jpg-
२५O१२५३५
रत्नागिरी ः सदानंद भागवत, गौरांग आगाशे, संदीप तावडे, वीणा लेले, शमीन शेरे
----
‘लायन्स’च्या सेवा पुरस्कारांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे प्रतिवर्षी समाजामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्काराने करण्यात येतो. यावर्षी हे पुरस्कार सदानंद भागवत, गौरांग आगाशे, संदीप तावडे, वीणा लेले आणि शमीन शेरे यांना घोषित करण्यात आले आहेत.
हे पुरस्कार लायन क्लबचे ज्येष्ठ सदस्य आणि लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येतात. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष आहे. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भागवत यांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच अनबॉक्स या स्टार्टअपमधून रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक कचरा संकलन करण्याचा उपक्रम राबवणारे उद्योजक आगाशे, ॲथलेटिक्स (धावणे, खो- खो, मॅरेथॉन) या क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे तावडे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती करून त्या सुयोग्य पद्धतीने चालवणाऱ्या आणि आता २०० जणांसाठी वृद्धाश्रम बांधणाऱ्या लेले आणि दिव्यांग मुलांसाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेरे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या व्यक्तींचा गौरव २४ जानेवारी रोजी प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते प्रांतपालांच्या अधिकृत भेटीदरम्यान करण्यात येणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com