यश सातत्यपूर्ण प्रयत्नातून साध्य होते
- rat२४p११.jpg-
P२५O१३०८७
राजापूर ः आबासाहेब मराठे महाविद्यालयात बोलताना गुरूकुल करिअर अॅकॅडमीचे संचालक बाजीराव जांभेकर.
----
यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक
बाजीराव जांभेकर ः रयत शिक्षणसंस्थेत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः कोणतेही यश हे अपघाताने नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नातून साध्य होते. आयुष्यात कधीही यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा वापर न करता सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन ओरस येथील गुरूकुल करिअर अॅकॅडमीचे संचालक बाजीराव जांभेकर यांनी केले. तसेच त्यांनी शाळा आणि महाविद्यालयातून चित्रकलेऐवजी चरित्रकला आणि जीवशास्त्राऐवजी जीवनशास्त्र शिकवणे गरजेचे असल्याचेही मत मांडले.
रयत शिक्षणसंस्थेच्या तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयात प्लेसमेंट सेल आणि रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शन समुपदेशनअंतर्गत ‘वेध भविष्याचा’ या विषयवार आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाराम राठोड, प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ.कुलभूषण ससाने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रप्रमुख प्रा. अतुल टिके आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. राठोड यांनी विद्यार्थ्यांनी सतत आपल्या ध्येयाप्रती कार्यप्रवण राहून त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन केले. तत्पूर्वी, डॉ. कुलभूषण ससाने यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. प्रतीक नाटेकर यांनी आभार मानले.

