लॅपटॉप, कलर प्रिंटर, टॅब वाटप

लॅपटॉप, कलर प्रिंटर, टॅब वाटप

Published on

- rat२४p१३.jpg-
२५O१३०८९
रत्नागिरी ः निवळी ग्रामपंचायतीतर्फे शाळांना लॅपटॉप, कलर प्रिंटर, टॅब, स्मार्ट टीव्ही तसेच सोलर लाईट आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच तन्वी कोकजे, उपसरपंच संजय निवळकर आदी.
-----
निवळीत शाळांना डिजिटल साहित्य
ग्रामपंचायतीचा पुढाकार ; लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : निवळी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना पंधराव्या वित्त आयोगातून लॅपटॉप, कलर प्रिंटर, टॅब, स्मार्ट टीव्ही तसेच सोलर लाईट यांचे वाटप करण्यात आले. सरपंच तन्वी कोकजे यांच्या हस्ते हे वाटप झाले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. या कार्यक्रमप्रसंगी सरपंच तन्वी कोकजे म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. मुलामुलींना स्वावलंबी व आधुनिक तंत्रज्ञानाच्यादृष्टीने अवगत करण्यासाठी हे साहित्य महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लवकरच कराटे व तायक्वांदोसारखे आत्मसंरक्षण प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
या वेळी उपसरपंच संजय निवळकर, ग्रामपंचायत सदस्य दीपाली देवरूखकर, गावचे पोलिस पाटील भालचंद्र शितप, आरोग्य विभागातून खंडाळकर, आशासेविका सोनाली शिंदे व सुविधा रावणंग यांच्यासह सर्व शाळांचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com