कोतवडेतील कृषी मेळाव्याला प्रतिसाद

कोतवडेतील कृषी मेळाव्याला प्रतिसाद

Published on

शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा मेळावा
कोतवडे येथे आयोजन; कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २४ ः रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळस्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला परिसरातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कोतवडे येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख, भाट्ये नारळ संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी विकास मेढे, प्रदीप भुवड आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तसेच खत व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. तसेच मंडळ कृषी अधिकारी मेढे यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. मागेल त्याला काजू योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यानंतर देसाई यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. मार्गदर्शन सत्रात डॉ. संतोष वानखेडे यांनी कीड व रोग व्यवस्थापनाविषयी शास्त्रीय व सविस्तर मार्गदर्शन केले. या कृषी मेळाव्याला सहाय्यक कृषी अधिकारी कांबळी, मयेकर, जुवळे, पवार तसेच एकूण सुमारे १०० शेतकरी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com