-गिम्हवणे केंद्राला सर्वसाधारण विजेतेपद

-गिम्हवणे केंद्राला सर्वसाधारण विजेतेपद

Published on

गिम्हवणे केंद्राला सर्वसाधारण विजेतेपद
दापोली क्रीडा स्पर्धा; वैयक्तीक, सांघिक प्रकारात यश
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २४ ः वार्षिक क्रीडा स्पर्धेत आदर्श शाळा मौजे दापोलीच्या खेळाडूंनी यश मिळवले. प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत मौजे दापोलीच्या मुलांनी सर्वच सांघिक खेळात जोरदार खेळाचे कौशल्य दाखवून गिम्हवणे केंद्राला जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिली. चंद्रनगर या ठिकाणी झालेल्या गिम्हवणे केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतही मौजे दापोलीच्या मुलांनी अशीच कामगिरी केली होती.
दापोली प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावणेमध्ये शर्व गावडे द्वितीय, लांब उडी मोठा गट यामध्ये सार्थक बुरटेने प्रथम व स्वयं जगदाळे याने द्वितीय तर उंच उडीमध्ये प्रणीत म्हसकर याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. लहान गटात मुलांमध्ये लांब उडीत रुद्र बुरटे प्रथम व थाळी, गोळाफेकमध्ये वेदांत पानवलकरने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींमध्ये उंच उडीमध्ये श्रद्धा हेरम हिने प्रथम क्रमांक मिळवला. केंद्रस्तरावर वैयक्तिक खेळप्रकारात ५० मीटर धावणे रुद्र म्हसकर, शर्व गावडे, रुद्र बुरटे, सार्थक बुरटे, प्रणीत म्हसकर, वेदांत पानवलकर, स्वयं जगदाळे, श्रद्धा हेरम, गुंजन देवकर, स्वरा म्हसकर, आराध्या म्हसकर, रिया म्हसकर यांनी यश मिळवले.
जिद्द, कौशल्य व सरावाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी केंद्र, प्रभाग तसेच तालुकास्तरावर यश मिळवले आहे, असे कौतुगोद्‍गार मुख्याध्यापक भरत गिम्हवणेकर यांनी काढले. त्यांना दत्ताराम गोरिवले, नरेंद्र जाधव, महेश कोकरे, योगेश्वरी सोंडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Marathi News Esakal
www.esakal.com