चिपळूणमध्ये १२ जानेवारीपासून किर्तनमाला
-ratchl२४१.jpg
२५O१३११३
चारुदत्त आफळे
-----
पेशवाईच्या सुवर्णकाळावर कीर्तनमाला
चिपळुणात १२ जानेवारीपासून आयोजन ; रसिकांना पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः येथील श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित कीर्तनमाला १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या दहाव्या कीर्तनमालेत पेशवाईचा सुवर्णकाळ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९.३० या कालावधीत ही कीर्तनमाला होईल.
कीर्तनमालेचे उद्घाटन १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या कीर्तनमालेचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती चारुदत्त आफळे यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते. दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा हा जागर रसिकांसाठी पर्वणी असतो. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप असणारी वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रवेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे स्मरणीय ठरत आली आहे. शहरातील बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक वासुदेव दळवीकाका महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या या कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून विषय उलगडत असतात.

