खेळाडू घडविण्यात क्रीडा शिक्षकांचे योगदान मोलाचे
rat२४p४.jpg-
२५O१३०३९
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये आयोजित क्रीडा महोत्सवात विजेत्या खेळाडूंसह मागे उभे राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू संपदा खातू, मुख्याध्यापक राजन कीर, विश्वेश जोशी, मंदार सावंत, आदी.
----
जिद्द, चिकाटीतून उत्तम खेळाडू घडतात
संपदा खातू ः फाटक हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : खेळाडू घडविण्यात क्रीडा शिक्षकांचे योगदान मोलाचे असून क्रीडा शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी यातूनच उत्तम खेळाडू घडत असल्याचे प्रतिपादन शाळेची पहिली राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू संपदा खातू यांनी केले. फाटक हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी मंचावर विशेष अतिथी आणि शाळेचा माजी विद्यार्थी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू स्वराज सावंत, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, क्रीडा विभागप्रमुख मंदार सावंत, बेबीताई पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी प्रतिनिधी आणि क्रीडा प्रतिनिधी उपस्थित होते.
वैयक्तिक आणि सांघिक खेळातील विजयी खेळाडूंना चषक आणि प्रमाणपत्र, उपविजयी आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सहावी ब, आठवी ब, दहावी ड-ई आणि बारावी क या वर्गांनी यावर्षीची जनरल चॅम्पियनशिप पटकावली. त्यासाठी चषक क्रीडा शिक्षिका बेबीताई पाटील यांनी वडील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ दिल्या. राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणाऱ्या फाटक हायस्कूलच्या १९ वर्षाखालील व्हॉलीबॉल संघातील खेळाडूंचा, विभागस्तरावर खेळलेल्या खेळाडूंचा आणि जलतरण स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या निधी भिडेचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय अजित चवेकर यांनी करून दिला. शिल्परेखा जोशी, दिनेश नाचनकर, वृषाली दळी, कीर्ती माढे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश काटकर, अनिल आग्रे यांनी आभार मानले.
---------
सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग
तीन दिवस सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रत्येक विद्यार्थ्याचा खेळात सहभाग हे या क्रीडा स्पर्धांचे वैशिष्ट्ये होते. पाचवी ते बारावीतील २६० विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेत, व्हॉलीबॉल स्पर्धेत ८४ संघ, ४×८० मीटर रिले स्पर्धेत ३४ संघ, डॉजबॉल स्पर्धेत १६ संघ, खोखो स्पर्धेत ४८ संघ, कबड्डी स्पर्धेत ४८ संघ आणि रस्सीखेच स्पर्धेत १६ संघ सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

