भाजप नगरसेवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या भेटीला
-rat२४p१२.jpg-
२५O१३०८८
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतील नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. सोबत अॅड. दीपक पटवर्धन आणि नगरसेवक, पदाधिकारी.
------
विकासकामांसह संघटन मजबूत करा
भाजप नगरसेवकांना, रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत १०० टक्के यश मिळवल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले. श्री. चव्हाण यांनी शहर व आपापल्या प्रभागात विकासात्मक कामकाज करण्याची सूचना करतानाच पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.
मुंबईत रायगड बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक राजेश तोडणकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे, नितीन जाधव, मानसी करमरकर या नगरसेवकांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन केला. सन्मानित करताना सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजप जिल्हा संयोजक अॅड. दीपक पटवर्धन, शहर संयोजक सचिन वहाळकर, उपस्थित जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी, संदीप रसाळ, मंदार खंडकर, उपस्थित होते.
रत्नागिरीमध्ये भाजप-शिवसेना महायुतीने नगरपालिका निवडणुकीत ३२ पैकी २९ जागा आणि एक नगराध्यक्षपद जिंकले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद वाढली असून पुढील निवडणुकीतही यश मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीत भाजपला सहा जागा लढवण्यास मिळाल्या. या सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवून भाजपने आपले पारंपरिक प्रभाग भाजपचेच असल्याचे दाखवून दिले. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाही प्रत्येक प्रभागातून मताधिक्य दिले आहे. त्यामुळे विकासकामात न्याय मिळाला पाहिजे, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.
चौकट १
भाजपला उपनगराध्यक्षपद
महायुतीची एकहाती सत्ता आल्यामुळे भाजपला उपनगराध्यक्षपद आणि काही सभापती पदे मिळणार आहेत. यामध्ये सहापैकी कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हा संयोजक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना नेते, मंत्री उदय सामंत यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर नावे निश्चित होतील. सध्या उपनगराध्यक्षपदासाठी समीर तिवरेकर आणि वर्षा ढेकणे यांच्या नावाची चर्चा चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

