मुख्याधिकारी जिरगेंनी घेतली बबन साळगावकरांची भेट

मुख्याधिकारी जिरगेंनी घेतली बबन साळगावकरांची भेट

Published on

swt2412.jpg
13144
सावंतवाडी ः येथील मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी बबन साळगावकर यांची भेट घेतली.

मुख्याधिकारी जिरगेंनी घेतली
बबन साळगावकरांची भेट
सावंतवाडी, ता. २४ ः येथील पालिकेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा निसटता पराभव झाला. ​याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आपली मैत्री जपत काल (ता.२३) सायंकाळी साळगावकर यांच्या ‘गुरुकुल’ या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी जिरगे यांनी साळगावकरांना धीर देत, निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता तुम्ही यापुढेही अधिक जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय राहावे; कारण तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची या शहराला मोठी गरज आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या सल्ल्याने साळगावकरांना एक प्रकारे नैतिक पाठबळ मिळाले असून, त्यांनी जिरगे यांचे आभार मानले आहेत. या भेटीवेळी नगरपरिषद कर्मचारी दीपक म्हापसेकर आणि बंड्या तोरस्कर उपस्थित होते.
---------------
swt2413.jpg
13145
सावंतवाडीः येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिप्ला एचआर विभागाचे अधिकारी.


भोसले इन्स्टिट्यूटच्या
३५ विद्यार्थ्यांची निवड
सावंतवाडी, ता. २४ः यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिप्लोमा विभागाच्या ३५ विद्यार्थ्यांची सिप्ला या आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये निवड झाली आहे. कॉलेजच्या वतीने सीझन्स फर्स्ट ड्राइव्ह अंतर्गत कॅम्पस मुलाखतींचे आयोजन केले होते. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या कॅम्पस ड्राइव्हच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य गजानन भोसले, सिप्ला एचआर टीम, ट्रेनिंग व प्लेसमेंट हेड मिलिंद देसाई, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख हर्षल पवार, मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे व महेश पाटील उपस्थित होते. ही निवड विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह संस्थेतील दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील संधी, कौशल्यविकासाचे महत्त्व आणि व्यावसायिक शिस्त याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com