रमा करमरकर ठरल्या ‘सुपर रँडोनिअर

रमा करमरकर ठरल्या ‘सुपर रँडोनिअर

Published on

-rat२४p२३.jpg-
P२५O१३१५०
रमा करमकर
----------
रमा करमरकर ठरल्या ‘सुपर रँडोनिअर’
जिद्द, सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास ; ६०० किमी ४० तासात पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : जिद्द, चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर कोणतीही आव्हाने पेलता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करत चिपळूण सायकलिंग क्लबच्या रमा करमरकर यांनी ‘सुपर रँडोनिअर’ हा मानाचा किताब पटकावला. ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे आयोजित २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरच्या बीआरएम यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत देशभरातील विविध क्लबमार्फत बीआरएम सायकल स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये २०० किमी साठी १३.५ तास, ३०० किमी साठी २० तास, ४०० किमी साठी २७ तास आणि ६०० किमी साठी ४० तासांची कमाल मुदत निश्चित असते. विशेष म्हणजे या सर्व राईड्स पूर्णपणे ‘सेल्फ-सपोर्टेड’ स्वरूपाच्या असतात. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सर्व ही चार अंतरे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सायकलस्वाराला ‘सुपर रँडोनिअर’ हा किताब प्रदान केला जातो. रमा करमरकर यांनी २० डिसेंबरला ६०० किमीची बीआरएम अवघ्या ४० तासांच्या आत पूर्ण करत हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. सह्याद्री रँडोनिअर्स क्लबतर्फे ही बीआरएम कऱ्हाड–सोलापूर–विजापूर–तासगाव–कऱ्हाड या आव्हानात्मक मार्गावर आयोजित करण्यात आली होती. मुंबई, सातारा, विटा, इचलकरंजी आणि चिपळूण येथून अनेक सायकलस्वार या मोहिमेत सहभागी झाले होते.
---
कोट
चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. प्रत्येक राईडमध्ये मिळालेला पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रेरणा अमूल्य ठरली.
रमा करमरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com