दहिवली बुद्रूकमध्ये स्वखर्चाने उभारले सहा बंधारे
- RATCHL२५३.JPG -
२५O१३३६१
चिपळूण ः दहिवली बुद्रूक येथे विकास घाग यांनी उभारलेले बंधारे.
--------
पाण्यासाठी झटणारा दहिवली बद्रुकचा हिरो
विकास घाग यांनी स्वखर्चाने बांधले सहा बंधारे ; शासनाकडूनही दखल
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः पाणी अडवा… पाणी जिरवा हा केवळ नारा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे दहिवली बद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते विकास घाग हे आज संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून अविरतपणे ते स्वखर्चातून बंधारे उभारून निसर्ग, पशुपक्षी आणि ग्रामस्थांसाठी पाण्याचा श्वास जपण्याचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांनी स्वखर्चातून सहा बंधारे उभारत जलसंधारणाचे काम अविरत सुरू ठेवले आहे.
दहविली बुद्रूक येथील घाग यांची स्वखर्चातून दरवर्षी ११ ते १३ बंधारे बांधण्याची परंपरा आहे. या बंधाऱ्यांमुळे जनावरांची तहान भागते, पशुपक्ष्यांना पाणी मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. सध्या पाण्याचा प्रश्न भीषण होत असताना, घाग यांनी गेल्या १५ ते २० वर्षांत विजय बंधारे, कच्चे-पक्के बंधारे उभारून पाणी अडवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आज दिसून येत असून, अनेक गावांतील विहिरी, नद्या पुन्हा जिवंत झाल्या आहेत. या निःस्वार्थ सेवाभावाची दखल शासनानेही घेतली आहे. चिपळूण तालुका आमसभेत घाग यांचा सन्मान करण्यात आला.
पावसाळा संपल्यावर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बंधारे बांधून त्यामध्ये पाणी साठवण्याचे काम ते नियमितपणे करतात. विशेष म्हणजे कोणतीही प्रसिद्धी न करता आपल्या कामाच्या साईटवर पाण्याचे स्रोत आढळले तर ते तेथे बंधारे व डोह (डुरे) तयार करतात. त्यामुळे पक्षी आणि वन्यप्राणीही तहान भागवू शकतात. घाग यांच्यासारख्या संवेदनशील ठेकेदारांनी पुढे येऊन हा उपक्रम राबवला तर दुष्काळाशी लढण्याची ताकद गावागावात निर्माण होईल.
--------
कोट
तालुक्यातील प्रत्येक गावांनी डिसेंबर महिन्यात कोरड्या नदीपात्रात शेवटचा प्रवाह असा बंधारे घालून अडवला तर नक्कीच काँक्रिट बंधाऱ्यांची गरज भासणार नाही. बंधाऱ्यावर १५ ते २० लाख खर्च करण्यापेक्षा जेसीबीचा वापर करून ४ ते ५ हजारात माझ्या पद्धतीचा बंधारा होतो. यावर जरूर सर्वांनी विचार करावा.
--विकास घाग, सामाजिक कार्यकर्ते, दहिवली बुद्रूक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

