कणकवलीत भात खरेदीचा प्रारंभ
13507
कणकवलीत भात खरेदीचा प्रारंभ
कणकवली : येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातर्फे शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२५-२६ सूरू केली आहे. या योजनेतंर्गत भात खरेदीचा प्रारंभ कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्याहस्ते झाला. भात उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी यापूर्वीच सूरू केली आहे. नोंदणीची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. यावर्षी शासकीय भात खरेदी आधारभूत किंमत प्रति क्विंटल २३६९ रू. जाहीर केली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपले भात संघाच्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावे, असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, कणकवली शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, संचालक प्रशांत सावंत, गुरूप्रसाद वायगणकर, गणेश तांबे, विनिता बुचडे, लिना परब, स्मिता पावसकर, व्यवस्थापक डी. आर. परब, माजी व्यवस्थापक गणेश तावडे, शेतकरी मनोहर राणे, प्रदीप राणे उपस्थित होते.

