कळसुलकर शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध
13627
कळसुलकर शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध
आनंद नेवगी ः फूड फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः ‘कळसुलकर हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी सदैव तत्पर आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले. शाळेतर्फे आयोजित फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्यावतीने शाळेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालकांच्या सहभागातून फूड फेस्टिव्हल या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. माजी विद्यार्थी व सावंतवाडी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते फीत कापून व सरस्वती मातेला हार अर्पण करून फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नेवगी, सुधीर आडिवरेकर, दुलारी रांगणेकर, प्रतीक बांदेकर, देव्या सूर्याजी, देवेंद्र टेमकर, सुनीता पेडणेकर यांचा संस्थेच्यावतीने संस्थाध्यक्ष शैलेश पई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. फूड फेस्टिव्हलमध्ये पालकांनी विविध खाद्य पदार्थांचे आकर्षक स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी या स्टॉलवरील पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी मुलांना आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान मिळावे, यासाठी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, सदस्य श्री. वझे, नम्रता नेवगी, मुख्याध्यापक श्री. भुरे, ‘प्राथमिक’चे मुख्याध्यापक श्री. सावंत उपस्थित होते. संस्थाध्यक्षांनी सक्रियपणे काम करणाऱ्या पालकांचे कौतुक केले. शिक्षक डी. जी. वरक यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक भुरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

