रत्नागिरी-उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

रत्नागिरी-उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Published on

rat26p31.jpg-
O13646
रत्नागिरी ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ५० दिव्यांच्या ताटाने ओवाळून महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले.
rat26p32.jpg
O13647
ज्येष्ठ बंधू आणि आमदार किरण सामंत यांनी मंत्री उदय सामंत यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
rat26p33.jpg-
O13648
अनेक पदाधिकाऱ्यांनी भलामोठा पुष्पहार घालून मंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या.
----------------

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात शुभेच्छांचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम झाले.
आज सकाळी साडेदहा वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचरणी उदय सामंत यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून शहर शिवसेनेकडून अभिषेक व प्रार्थना केली. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना सकाळी अकरा वाजता फळेवाटप झाले. साडेअकरा वाजता रिमांडहोम रत्नागिरी येथे मुलांना खाऊ चॉकलेट, बिस्कीट व गरजेच्या वस्तू वाटप केल्या. प्रभाग क्र. ६ मधील शिवसेना-भाजप पदाधिकारी व नूतन नगरसेवकांनी आशादीप मतिमंद मुलांच्या वसतिगृहामध्ये ब्लॅंकेट वाटप केले. उत्सवमूर्ती आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने येथील विमानतळावर दाखल झाले. तेथे अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आले. तेथे दाखल झाल्यानंतर सर्कलभोवती आतषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी या भागात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले होते. उदय सामंत कार्यालयात दाखल होताच महिला पदाधिकाऱ्यांनी पन्नास दिव्यांच्या ताटाने ओवाळत त्यांचे औक्षण केले. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मित्र आदींनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सुमारे अडीच तास हा शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर ते तीन वाजता पुन्हा मुंबईला रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com