महिला सक्षमीकरणासाठी भव्य प्रभातफेरी
rat२७p२.jpg-
P25O13734
रत्नागिरी- जयगड आदिशक्ती अभियान समितीमार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य प्रभातफेरी काढण्यात आली.
---------
महिला सक्षमीकरणासाठी प्रभातफेरी
आदिशक्ती अभियानतर्फे जयगड ग्रामपंचायतीत आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : येथील ग्रामपंचायत जयगड आदिशक्ती अभियान समितीमार्फत आज महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी पेठवाडी मराठी शाळा या ठिकाणाहून सुरू होऊन साईमार्गाने ग्रामपंचायत जयगड, सडेवाडी-मराठी शाळा आणि पुन्हा तेथून ग्रामपंचायत जयगड कार्यालय अशी काढण्यात आली. यानंतर ग्रामपंचायत जयगडच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिलांसाठी मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला.
या वेळी आदिशक्ती अभियान समितीच्या अध्यक्षा स्वप्नाच्या खाडे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. या कार्यक्रमाला जयगड विद्यामंदिर येथील प्राध्यापिका श्रद्धा पाष्टे, पारकर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कुळ्ये, आदिशक्ती अभियान समितीचे उपाध्यक्ष जयगड अनिरुद्ध साळवी, पर्यवेक्षिका केतकर आदी उपस्थित होते. ओवी परकर या चिमुरड्या मुलीने संविधान अर्पण पत्रिकेचे मुखोद्गत वाचन केले. प्रभातफेरीमध्ये मुलींच्या हातामध्ये महिलांबाबत घोषणावाक्य फलक होते तसेच महिला सक्षमीकरण, सबलीकरण, स्वावलंबीकरण याबाबत घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण जयगड गावांमध्ये या कार्यक्रमामुळे एक चैतन्य निर्माण झाले आहे. महिलावर्गाचा सक्रिय आणि आनंदी सहभाग या निमित्ताने जयगडमध्ये दिसून आला.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

