आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल करा
13756
आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल करा
प्रा. काजरेकर ः अणसूर-पाल हायस्कूलमध्ये गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने प्रामाणिकपणे व चिकाटीने प्रयत्न करावेत. त्यासाठी वाचन वाढवा. हस्ताक्षर सुंदर हवे. दिवसाचे किमान सहा तास आतापासून अभ्यास करा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, समीक्षक व गोगटे वाळके कॉलेजचे प्राचार्य गोविंद काजरेकर यांनी केले. अणसूर-पाल हायस्कूलच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.
अणसूर-पाल हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ नुकताच हायस्कूलच्या बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात झाला. यावेळी अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष गोविंद गावडे, संस्था सचिव लिलाधर गावडे, शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, सदस्य दीपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, पाल सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, संस्था सदस्य अशोक गावडे, राजन गावडे, पाल माजी सरपंच व दाते वासुदेव बर्वे, अनिल गडकर, अणसूर पोलिसपाटील अश्विनी खवणेकर, उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘पक्षीजगत’ रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन गोविंद गावडे व ‘कलाविष्कार’ या शालेय चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. काजरेकर यांच्या हस्ते झाले. दहावी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक साहिल गावडे, धनश्री गावडे, लक्ष्मी तेंडोलकर यांना तसेच प्रत्येक विषयात प्रथम आलेले विद्यार्थी व आठवी-नववीमध्ये प्रथम आलेल्या आणि विविध क्रीडा-स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू प्राची गावडे व संतोष नाईक, वेदांत गावडे, हर्षदा गावडे, ‘आदर्श विद्यार्थी’ बहुमान प्राप्त श्रीयश मालवणकर यांचा गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी अहवाल वाचन केले. विजय ठाकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षता पेडणेकर व चारुता गावडे-परब यांनी बक्षीस वाचन केले. संचिता परब यांनी आभार मानले. आजी-माजी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा ‘रंगशिशिर’ कार्यक्रम झाला.
....................
‘स्मार्ट शाळा’ बनविण्याचा संकल्प
शाळांच्या अस्तित्त्वाबद्दल धोका निर्माण झाला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावची शाळा कधीही बंद पडू देणार नाही. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे गोविंद गावडे यांनी सांगितले. लवकरच डॉ. स्नेहा गावडे यांच्या माध्यमातून हायस्कूलच्या तिन्ही वर्गांत डिजिटल बोर्ड बसवून शाळा जिल्ह्यातील पहिली स्मार्ट शाळा बनविण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

