माखजन येथे श्री सदस्यांनी केले जल पुनर्भरण

माखजन येथे श्री सदस्यांनी केले जल पुनर्भरण

Published on

-rat२७p५.jpg-
२५O१३७४३
माखजन : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सदस्यांनी जलपुनर्भरण केले. या वेळी उपस्थित सरपंच महेश बाष्टे, प्रशांत रणखांब, अजिज आलेकर, किशोर तांबट आदी.
---
माखजनमधील सात विहिरींमध्ये जलपुनर्भरण
धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम; पाणीसाठा वाढण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी जिल्ह्यातील माखजन येथे जलसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. माखजन जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. १, माखजन हद्दीतील सार्वजनिक व खासगी विहिरी, विंधन विहिरीमध्ये जलपुनर्भरण कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला. सात विहिरी व विंधन विहिरीमध्ये जलपुनर्भरण करण्यात आले. पावसाचे प्राणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. तेच पाणी जमिनीमध्ये सोडण्यासाठी एक विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ते पाणी विहीर व बोरवेलच्या परिसरात जमिनीमध्ये सोडण्याची योजना केली जाते. छतावर पडणारे पाणी एकत्र करून ते पाणी शुद्ध होऊन गाळून जाण्याची यंत्रणा तयार करून ते पाणी विहीर, विंधन विहिरीच्या अवतीभवती जमिनीमध्ये खड्डे मारून सोडले जाते. या द्वारे जाणीवपूर्वक जमिनीत पाणी सोडण्याची प्रक्रिया केल्याने जमिनीमधील पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे विंधन विहिरीत किंवा विहिरीमध्ये बारा महिने पुरेल एवढे पाणीसाठा उपलब्ध होतो.
माखजन येथील सार्वजनिक व विंधन विहिरीत जलपुनर्भरण करण्यात आले. या वेळी सरपंच महेश बाष्टे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत रणखांब, ग्रामपंचायत सदस्य अजिज आलेकर, किशोर तांबट, डॉ. परांजपे, मोहन दळी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सतीश साठे, मंगेश दळी आदी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल सरपंच बाष्टे व तंटामुक्ती अध्यक्ष सतीश साठे यांनी आभार मानले. माखजन गाव व परिसरामध्ये जास्तीत जास्त जलपुनर्भरण करण्याचा संकल्प सोडला.
-------
चौकट
जलपुनर्भरणाबाबत सकारात्मकता वाढतेय
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा प्रकारे जलपुनर्भरण योजना राबवण्यात येते. जलपुनर्भरण योजनेचे अनेक प्रयोग रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यामध्ये करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एप्रिल-मे महिन्यातील पाणीटंचाई दूर झाली आहे. समाजामध्ये जलपुनर्भरणबाबत सकारात्मकता वाढली आहे. पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये जलपुनर्भरण योजनेची मागणी होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com