लहान गटात अभिरूची कोल्हापूरचा ‘ठोंब्या’ सरस
13777
लहान गटात अभिरूची कोल्हापूरचा ‘ठोंब्या’ सरस
नाथ पै एकांकिका स्पर्धा; ‘पांडुरंग नागू आणि सावतोबाचा’ द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२७ : वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेत लहान गटात अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने प्रथम क्रमांक पटकाविला. एस.एम.हायस्कूलच्या ‘पांडुरंग नागू आणि सावतोबाचा’ला द्वितीय तर आयडियल इंग्लिश स्कूल नेरुरची ‘देवराई’ला तृतीय क्रमांक मिळाला. माध्यमिक विद्यामंदिर शिवडावच्या ‘आये’ने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा ः उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम-प्रसाद लाड (पांडुरंग नागू आणि सावतोबाचा), द्वितीय-जितेंद्र देशपांडे (ठोंब्या), तृतीय किशोर नाईक (देवराई). तांत्रिक अंगे : प्रथम-देवराई (आयडियल इंग्लिश स्कूल नेरूर), द्वितीय-ठोंब्या (अभिरूची कोल्हापूर), तृतीय-पांडुरंग नागू आणि सावतोबाचा (एस.एम.हायस्कूल). अभिनय पुरुष : प्रथम-आरव गुळवणी (ठोंब्या), द्वितीय-नील जोशी (सवतोबा), तृतीय-अर्थव गावकर (बबल्या), अभिनय स्त्री : प्रथम-संस्कृती शर्मा, द्वितीय-सावी मुद्राळे (डीजे), युथ फोरमची ‘लगोरी’, तृतीय-भूमिका कुबडे (अंतरावीर २), शिरगाव हायस्कूलची ‘थोर तुझे उपरकर’, उत्तेजनार्थ-अभिनय पुरुष : रितूल चव्हाण (रितूल सर), वेणू माधव सावदती (गरूड), अनुराग खाडीलकर (शंकर), अभिनय स्त्री: प्रांजल कुलकर्णी (मधू), आरोही मेस्त्री (आरोही), निधी धुरी (परी). दरम्यान, या स्पर्धेचे परीक्षण प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रिया जामकर, तुषार भद्रे यांनी केले.

