ई-निबंध स्पर्धेत चैताली सावंत प्रथम
ई-निबंध स्पर्धेत चैताली सावंत प्रथम
कुडाळ ः पुष्पसेन सावंत कृषी महाविद्यालय वाडीहुमरमळातर्फे शिवप्रताप दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ई-निबंध स्पर्धेत चैताली सावंत हिने प्रथम, द्वितीय श्रुती पोपकर व वैष्णवी साईल आणि अक्षता देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील अकरावी व बारावी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी शिवकालीन प्रशासन- लोकाभिमुख राज्यकारभार, शिवकालीन स्त्री सुरक्षा व आजची गरज, शिवाजी महाराजांसारखा नेता का हवा?, जर शिवाजी महाराज आजच्या युगात असते तर, या विषयांवर विद्यार्थ्यांनी निबंध सादर केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार अजून विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व विजेत्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रकाश चव्हाण, स्नेहल मराठे, तृप्ती मेस्त्री यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष भूपतसेन सावंत यांनी आभार मानले.

