असलदे माऊली मंदिराचा वर्धापन उत्साहात
13804
माऊली मंदिराचा वर्धापन उत्साहात
नांदगाव ः असलदे मधलीवाडी येथील माऊली मंदिराचा जीर्णोद्धार वर्धापन दिन सोहळा २५ व २६ डिसेंबरला उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रात्री चेंदवणकर दशावतार नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सत्यनारायण महापूजेने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. रात्रभर पारंपरिक भजनांनी परिसर भक्तिमय झाला होता. शुक्रवारी (ता. २६) सकाळी नऊला श्री माऊली देवीला अभिषेक, दुपारी महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. रात्री १०.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘सूर्यग्रहण’ हा नाट्यप्रयोग सादर झाला. या नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी असलदे मधलीवाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

