छत्रपती शिवरायांची पोवाड्यातून उजळली शौर्यगाथा

छत्रपती शिवरायांची पोवाड्यातून उजळली शौर्यगाथा

Published on

13805

छत्रपती शिवरायांची पोवाड्यातून उजळली शौर्यगाथा

‘मदर क्विन्स’चे स्नेहसंमेलन; सवेश नृत्याविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी उत्साहात झाला. जगात सत्य व अहिंसेचे तत्व रुजवणाऱ्या महात्मा गांधींची महती सांगणारे नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या भेटीतील प्रसंग साकारणारा पोवाडा विशेष लक्षवेधी ठरला.
शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारकांचा सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आला. दहावीची विद्यार्थिनी पूर्वा गावडे हिला सीन्सियर स्टुडंट ॲवॉर्ड देऊन गौरविले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गटशिक्षणाधिकारी सविता परब (पंचायत समिती, सावंतवाडी) यांना प्रशालेतर्फे स्नेहभेट देऊन सन्मानित केले. शाळेची गुणवत्तापूर्ण प्रगती व विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी दर्शविणाऱ्या डॉक्युमेंटरीचे सादरीकरण करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे संचालक डी. टी. देसाई, सहसंचालक ॲड. श्यामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर आदी उपस्थित होते.
श्री गणेश देवतेची नृत्याद्वारे आळवणी करून सोहळ्याची सुरुवात झाली. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांनी कलागुण सादर केले. यामध्ये ऐंशीच्या दशकातील सुमधूर रेट्रो गाण्यांच्या तालावर लहान मुलांनी नृत्ये प्रस्तुत केली. सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, जंकफूडमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, बालपणातील मनोरंजक खेळ व मुक्तपणे मैदानावर बागडण्यातील आनंद दर्शविणारे क्षण नृत्याद्वारे व्यक्त करण्यात आले. गुरूभक्त एकलव्याची गुरुनिष्ठा, जगात सत्य व अहिंसेचे तत्व रुजवणाऱ्या महात्मा गांधींची महती, झासीची राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचे स्मरण करणारे नृत्य, छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या भेटीतील प्रसंग साकारणारा पोवाडा, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचे झुंजार शौर्य, पोलिस व आर्मीप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी नृत्ये सादर केली. विद्यार्थ्यांनी सुसंगत वेशभूषा परिधान करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे निवेदन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केले. इंतीझिया फर्नांडिस यांनी अहवाल वाचन केले. अमिना नाईक यांनी आभार मानले. मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com