भडकंबा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
rat२७p१९.jpg
२५O१३७८६
ःसाखरपा : विकासकामांचे भूमिपूजन करताना शिवसेना पदाधिकारी.
भडकंबा गावाचा कायापालट करणार
प्रशांत उर्फ बापू शिंदे ः विकासकामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २७ : राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघाचे आमदार किरण सामंत व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सहकार्याने भडकंबा गावातील मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. अनेक विकासकामे येत्या वर्षभरामध्ये पूर्ण करून भडकंबा गावाचा कायापालट करणार व भडकंबा गावाचे नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर नेणार, असा ठाम विश्वास या कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे यांनी व्यक्त केला.
या कामांमध्ये विशेषतः भडकंबा येथे क्रीडा मैदान बनवणे, भडकंबा पाकतेकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे, भडकंबा मुस्लिमवाडी अंतर्गत काँक्रिटीकरण या कामाचा समावेश आहे. सदर कामे मंजूर होण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिला. भविष्यामध्ये अजूनही कार्यक्रमाचे भूमिपूजनप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, माजी सभापती जयसिंग माने, विभागप्रमुख राजूशेठ कामेरकर, ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर, महिला आघाडीच्या रेश्मा परशेट्ये, सरपंच शेखर आकटे, सरपंच सिद्धी कटम, उपसरपंच केतन दुधाणे, ग्राम पंचायत सदस्य बाळू जामसंडेकर, गावकर संजय नवाले, गणपत शिर्के, बापू साठविलकर, याकूबमियाँ साठविलकर, रामचंद्र बाईत, लियाकत रमदूल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

