कोकण
रत्नागिरी- दाखल्यांसाठी ३० डिसेंबरला कुवारबावला शिबिर
दाखल्यांसाठी ३० डिसेंबरला कुवारबावला शिबिर
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरी तालुक्यातील सर्व विमुक्त जाती भटक्या जमातींना जातीचे प्रमाणपत्र सह इतर सर्व दाखले देण्याकरता अर्ज करण्यासाठी ३० डिसेंबरला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कुवारबांव ग्रामपंचायत येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्ममृत्यू प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी दाखले काढून दिले जातील. जास्तीत जास्त समाजबांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भटक्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य बी. टी. मोरे यांनी केले आहे.

