होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत फाटक हायस्कूलचे यश

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत फाटक हायस्कूलचे यश

Published on

rat28p3.jpg-
13961
रत्नागिरी : डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेसाठी निवड झालेले फाटक हायस्कूलमधील विद्यार्थी. सोबत मागे उभे मुख्याध्यापक राजन कीर, विश्वेश जोशी, नेहा शेट्ये, श्रावणी जोशी आदी.
--------

भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत
फाटक हायस्कूलचे यश
रत्नागिरी, ता. २८ : बृहन्मुंबई विज्ञान परिषदेमार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत फाटक हायस्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीतील लेखी परीक्षेत यश संपादन केले. दुसऱ्या फेरीतील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्यांची निवड झाली आहे.
बालवैज्ञानिकांचा शोध घेण्यासाठी सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेला फाटक हायस्कूलमधून इयत्ता सहावीतील २५ आणि इयत्ता नववीतील ८ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये इयत्ता सहावीतील गार्गी देवल, मुमुक्षा वझे, सुयश गराटे, मिहीर खाडिलकर, श्रीवेद सनगरे, ध्रुव बुरोंडकर व स्पृहा भावे या विद्यार्थ्यांनी पहिली फेरी यशस्वीपणे पूर्ण केली. ४ जानेवारीला होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षिका श्रावणी जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप भातडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी आणि पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांनी अभिनंदन केले असून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com