

rat28p12.jpg-
13980
अस्मि साळुंखे
--------
अस्मि साळुंखे हिला
सुवर्णासह चार पदके
सब ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा
पावस, ता. २८ ः राज्यातील अव्वल सब ज्युनिअर खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अस्मि तुषार साळुंखे हिने उत्कृष्ट कामगिरी केली. तिने एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कास्य अशी चार पदके जिंकून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा कुडाळ येथे झाली. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या चुरशीच्या स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेणारी व पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेली अस्मि साळुंखे हिने तायक्वांदो फाईट प्रकारात रौप्यपदक, फ्री स्टाईल सिंगल प्रकारात सुवर्ण पदक, पुमसे ग्रुप प्रकारात रौप्यपदक आणि आणखी एका प्रकारात कास्यपदक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली. शशीरेखा कररा यांनी तिला मार्गदर्शन केले.