मंडणगड-संवेदना फाउंडेशनचा ब्लँकेट वाटप

मंडणगड-संवेदना फाउंडेशनचा ब्लँकेट वाटप
Published on

Rat29p10.jpg
14146
घराडी: संवेदना संस्थेचे अध्यक्ष विनोद चाळके घराडी शाळेत ब्लँकेट वाटप करताना. सोबत डावीकडून मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता.

संवेदना फाउंडेशनतर्फे
स्नेहज्योतीमध्ये ब्लँकेट वाटप
मंडणगड, ता. २९ः संवेदना फाउंडेशन संस्थेच्यावतीने स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी येथे ब्लँकेट वाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी विशेष योगदानाबद्दल विद्यार्थिनी पूजा हिचा सन्मान करण्यात आला.
घराडी येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विनोद चाळके, सदस्य सुधाकर महाडिक तसेच अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता उपस्थित होत्या. संवेदना फाउंडेशन ही महाराष्ट्रातील सामाजिक भान जपणारी संस्था असून अंध, अपंग, कुष्ठरोगी बांधवांसह आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या २१ वर्षांपासून संस्था सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, गरजूंना दिलासा देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. तसेच संस्थेच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत जागतिक सन्मान झालेला आहे. यापूर्वी संस्थेने अंध विद्यालयांमध्ये आधारकार्ड शिबिरे, नाट्यस्पर्धा, स्नेहभोजन, बालगौरव पुरस्कार सोहळे, आरोग्य शिबिरे, धान्य वाटप, तसेच कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी मुंबईत गायन कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. समाजातील दु:खी व गरजू घटकांसाठी मदतीचा हात देण्याचे कार्य असेच सुरू राहील, असे मत संस्थेचे चाळके यांनी व्यक्त केले. या उपक्रमाबद्दल अंध विद्यालयातर्फे संस्थेचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे हितचिंतक समाजसेवक भागवत शिंदे, नीलम फूडलँड, खार मुंबई येथील नितेशभाई शहा यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com