शिराळेवासीयांची आजपासून ''गावपळण''

शिराळेवासीयांची आजपासून ''गावपळण''

Published on

14415

शिराळेवासीयांची आजपासून ‘गावपळण’

राहुट्या; ‘सडुरे गावपत्थर’ परिसर गजबजणार

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः शेकडो वर्षांची पंरपरा असलेल्या शिराळे गावपळणला उद्यापासून (ता. ३१) सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिराळेवासीयांची लगबग सुरू झाली आहे. राहुट्या उभारणे, सारवण करणे, गुराढोरांसाठी तात्पुरते गोठे उभारण्याच्या कामे जोरात सुरू आहेत. उद्या सायकांळी सर्व गावकरी सडुरे येथील ‘गावपत्थर’ या ठिकाणी दाखल होणार आहेत.
चारशे साडेचारशे वर्षांची पंरपंरा असलेल्या शिराळे गावपळणीला उद्या सायंकाळपासून सुरुवात होणार आहे. गेले दोन दिवस गावकरी ‘सडुरे पत्थर’ या ठिकाणी जागेची साफसफाई करणे, राहुट्या उभ्या करणे, गुरांसाठी तात्पुरते गोठे उभारणे, राहुट्यांमधील सारवण करणे अशी कामे करत असल्याचे चित्र आहे. याशिवाय चार-पाच दिवस पुरण्याइतका अन्नधान्य आणि इतर साहित्यीची बांधाबांध सुरू झाली आहे. गावातून आल्यानंतर पुन्हा गावात जात नसल्यामुळे एकाच वेळी सर्व साहित्य गावकरी राहत असलेल्या ठिकाणी घेऊन येतात. उद्या सायकांळी सर्व गावकरी गुराढोरे आणि अन्य पाळीव पशुपक्ष्यांसह सडुरे येथील राहुट्यांमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस सर्व गावकरी एकाच ठिकाणी राहणार आहेत. विद्यार्थ्यांची प्राथमिक शाळा देखील त्याच ठिकाणी भरणार आहे. याशिवाय ग्रामस्थांच्या सोयीसाठी गावात जाणारी बस देखील त्याच ठिकाणी थांबते.
--
परंपरेचा आता बनला उत्सव
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली गावपळण आता गावकऱ्यांचा उत्सव बनला आहे. सर्व गावच एकत्र येत नांदत असल्यामुळे आनंदाचे वातावरण या परिसरात असते. मुंबईसह इतर भागात नोकरी धंद्यानिमित्त गेलेली मंडळी या कालावधीत आवर्जून येऊन गावपळणीचा आनंद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com