मठ येथील विकासकामांसाठी १ कोटी ७५ लाख निधी मंजूर
15363
मठ येथील विकासकामांसाठी
एक कोटी ७५ लाखांचा निधी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ ः मठ गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासकामासाठी पाठपुरावा सुरु होता. खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून मठ गावातील एकूण आठ विकासकामांसाठी १ कोटी ७५ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी शनिवारी केले.
मठ गावातील एकूण आठ विकासकामांचे भूमिपूजन दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यामध्ये मठ कणकेवाडी शाळा क्र. ३ नवीन इमारत बांधणे, दक्षिण कणकेवाडी रस्ता, मठ वडखोल रस्ता, कणकेवाडी स्टॉप रस्ता, टाकयेवाडी रस्ता, शिवाजी चौक ते ठाकूरवाडी रस्ता, धुरीवाडी ते कावलेवाडी रस्ता, मठ शाळा क्र. १ नजीक अंगणवाडी इमारत बांधणे आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमांस भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मठ सरपंच रुपाली नाईक, उपसरपंच सोनिया मठकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सायमन आल्मेडा, वेंगुर्ले श्री देवी सातेरी देवस्थानचे दाजी परब, मारुती दोडशानट्टी, ग्रामपंचायत सदस्य संतोष वायंगणकर, सिद्धी गावडे, शमिका मठकर, माजी सदस्य समीर मठकर, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, मुख्याध्यापक वीरधवल परब आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

