कार्यकर्तृत्वामधून श्रेष्ठता सिद्ध करा

कार्यकर्तृत्वामधून श्रेष्ठता सिद्ध करा

Published on

15494

कार्यकर्तृत्वामधून श्रेष्ठता सिद्ध करा

संदीप गावडे ः तळवडे शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः यशस्वी होणे ही सोपी गोष्ट आहे; मात्र माणूस तिला अवघड बनवतो. आपल्याला कोणते ध्येय गाठायचे आहे, हे शैक्षणिक जीवनाच्या सुरुवातीलाच निश्चित केले, तर यशस्वी होण्याची शक्यता ही शतप्रतिशत असते. आपल्याला कोणते काम करणे आवडते, त्यानुसार आपले क्षेत्र निवडावे. कोणतेही क्षेत्र श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसते. आपल्या कर्तृत्वाने त्यातील श्रेष्ठता सिद्ध करायची असते, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी तळवडे येथे केले.
तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गावडे बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, संचालक रवींद्र परब, सुरेश गावडे, प्रा. दिलीप गोडकर, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती पंकज पेडणेकर, सरपंच वनिता मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ नागडे, सामाजिक कार्यकर्ते दादा परब, संस्था सदस्य दादा पेडणेकर, प्रसाद पेडणेकर, भूषण पेडणेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका विदुल पाटकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष उमेश पावणोजी, सदस्य प्रभाकर कुंभार, माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा संजना पेडणेकर आदी उपस्थित होते.
श्री. काळे यांनी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची एक वेळ असते, त्यासाठी संयम बाळगायला शिका, असे आवाहन केले. संदीप गावडे, विजय काळे, नीलकंठ नागडे, विशाल होडवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक देसाई यांनी अहवाल वाचन केले. अंकुश चौरे यांनी स्वागत केले. मिलन देसाई यांनी पारितोषिकांचे वाचन केले. प्रसाद आडेलकर यांनी सूत्रसंचालन केले. किशोर नांदिवडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com