बांद्यात आपत्ती निवारण इमारतीचे काम

बांद्यात आपत्ती निवारण इमारतीचे काम

Published on

15858

बांद्यात आपत्ती निवारण इमारतीचे काम
बांदा, ता. ७ ः येथील तलाठी कार्यालयाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या आपत्ती निवारण इमारत कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सातत्याने ही मागणी लावून धरली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या माध्यमातून ही इमारत उभारण्यात येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती, वादळ, आग लागणे तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी, यासाठी ही आपत्ती निवारण इमारत उपयुक्त ठरणार आहे. या इमारतीमुळे आपत्कालीन प्रसंगी मदतकार्य अधिक वेगाने व प्रभावीपणे राबवता येणार असून प्रशासनाच्या कामकाजालाही मोठी चालना मिळणार आहे. भूमिपूजनप्रसंगी बोलताना माजी सभापती शीतल राऊळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. आपत्तीच्या काळात आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ आणि साधनसामग्री एका ठिकाणी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असून, ही इमारत त्या दृष्टीने बांदा परिसरासाठी अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा भाजपच्या पाठपुराव्यामुळे हा महत्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रांतिक सदस्य शाम काणेकर, जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर, मंडळ तालुकाध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी सभापती शीतल राऊळ, उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच अशोक सावंत, दादू कविटकर, महिला तालुकाध्यक्ष रुपाली शिरसाट, बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे,बांदा सोशल मीडिया प्रमुख विराज परब, देवलं येडवे, तनुजा वराडकर, सिद्धेश पावसकर, शक्तिकेंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, बूथ अध्यक्ष अक्षय परब, राकेश केसरकर, सिद्धेश महाजन, सचिन काणेकर, विजय बांदेकर, स्वप्नील जाधव, जगन्नाथ सातोसकर, शैलेश केसरकर, आपा धामापूरकर, साई कल्याणकर, वालेतीन आल्मेडा, राजु वाळके, तसेच तलाठी फिरोज खान, महेश गोवेकर, हरिचंद्र साळगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com