सांगेली येथील ''तो'' रस्ता
अखेर प्रशासनाकडून खुला

सांगेली येथील ''तो'' रस्ता अखेर प्रशासनाकडून खुला

Published on

O16124

सांगेलीतील ‘तो’ रस्ता अखेर खुला
सावंतवाडी, ता. ७ ः सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड गोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडविल्याचा प्रकार सांगेली येथे घडला होता. हा रस्ता आठवडाभरानंतर आज सकाळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला.
रस्ता अडविल्याप्रकरणी जमीन मालक श्रीकांत खोत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सांगेली येथील नदीपत्रातील वाळू आणि दगडगोटे यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार राजकुमार राऊळ यांच्यासह श्रीकांत खोत व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून उपोषण केले होते. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. या तक्रारीच्या रागातून आठवडाभरापूर्वी खोत यांच्या घर व जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतून रस्ता बंद करण्याचा प्रकार घडला. हा रस्ता सार्वजनिक आणि ग्रामपंचायतीच्या २३ नंबरला असल्याची खात्री केल्यानंतर तहसीलदार पाटील यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते; तरीही कार्यवाही न झाल्याने स्वतः तहसीलदारांनी मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत रस्ता खुला करून दिला. तहसीलदारांनी तक्रारदार खोत यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com