‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव
-rat७p५.jpg-
२६O१६१०२
रत्नागिरी : ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत देताना योगेश मगदूम. सोबत अनुष्का शेलार, प्रवीण लिंगायत, अनघा मगदूम, अमोल देसाई, प्रियल जोशी आदी.
-------
‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव
२२पासून सुरुवात; विसर्जन मिरवणूक २८ जानेवारीला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्यावतीने ‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव येत्या २२ जानेवारीपासून साजरा केला जाणार आहे. उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन-कीर्तन, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या यंदा दुसरे वर्ष असून, २२ जानेवारीला सकाळी ७ वा. श्रींच्या विधी विधिवत प्राणप्रतिष्ठापनेने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. रात्री ८ वा. बुवा उदय मेस्त्री आणि श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाचे (केळ्ये) भजन होईल. २३ ला श्री सत्यनारायणाची महापूजा, संध्याकाळी ५ वा. हळदीकुंकू, तर रात्री ८ वा. बुवा गौरव पांचाळ व साई प्रासादिक भजन मंडळ (फुणगूस, ता. संगमेश्वर) यांचे भजन होईल. २४ ला सकाळी ९ वा. कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी ७ वा. प्रवीण मुळ्ये यांचे गणेशपुराण सार यावर कीर्तन होईल. २५ला सकाळी ८ वा. सांबरे हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वा. महिलांसाठी पैठणी सम्राज्ञी हा पारंपरिक खेळ आयोजित करण्यात आहे. मानाची पैठणी तसेच बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रजासत्ताकदिनी सकाळी ८ ते ११ या कालावधीत जिलेबी वाटप व रक्तदान शिबिर होईल. संध्याकाळी ७ वा. ‘स्वरसमर्पण’ हा भक्तिपर व देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या काही गीतांचाही यात समावेश करण्यात आला आहे. २७ ला सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. सकाळी ७ वा. जीजीपीएस गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सकाळी १० वा. बुवा साहिल सावंत व श्री सोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ (उक्षी) यांचे भजन होणार आहे. दुपारी १२ वा. महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वा. महाआरतीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बुवा उमेश लिंगायत, हरिनाम भजन मंडळ (संगमेश्वर) भजन करतील. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. २८ ला सायंकाळी ४ वाजल्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. या महाउत्सवाच्या निमित्ताने भक्तांसाठी दररोज लकी ड्रॉ निघणार असून, उत्सवकाळात दररोज संध्याकाळी विजेते जाहीर होणार आहेत. पत्रकार परिषदेला मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, सहसचिव अनघा मगदूम, खजिनदार अमोल देसाई, प्रियल जोशी उपस्थित होते.
-----
चौकट १
महागणपतीवर रिल स्पर्धा
२२ ते २६ जानेवारी या कालावधीत रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एक दिवस महागणपतीसोबत आणि माझी एक चांगली सवय महागणपतीसाठी असे विषय देण्यात आले आहेत. याचे बक्षीस वितरण २७ जानेवारी रोजी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

