बांदा केंद्रशाळेमध्ये विद्यार्थी गुणगौरव
swt1112.jpg
16922
बांदा ः केंद्रशाळेतील विद्यार्थी व मान्यवर.
बांदा केंद्रशाळेमध्ये विद्यार्थी गुणगौरव
स्नेहसंमेलन उत्साहात; स्पर्धा, परीक्षांमधील गुणवंतांना बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ः येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्तिदिनाचे दिनाचे औचित्य साधून शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा बांदा सरपंच प्रियंका नाईक उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, प्राधिकरण सदस्य रुपाली शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य देवल एडवे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संपदा सिद्धये आदी उपस्थित होते.
प्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सरपंच नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. स्वागत मुख्याध्यापक शांताराम असनकर व सहाय्यक शिक्षिका अर्चना देसाई यांनी केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक असनकर यांनी शाळेची वैशिष्ट्ये, शालेय गरजा, विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी व नवीन वर्षातील शैक्षणिक संकल्प यांची सविस्तर माहिती दिली.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेच्या बळावर इतरांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. वर्षभरात शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. आभार श्री. आगलावे यांनी मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. महिला मुक्तिदिनाचे औचित्य साधत अन्वी शिंदे हिने ‘मी सावित्री बोलते’ ही व्यक्तिरेखा सादर करून रसिकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या लावणी, सोलो डान्स, पहिलीच्या विद्यार्थ्यांचा फॅशन शो विशेष आकर्षण ठरला. सूत्रसंचालन उदय सावळ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

