आंदुर्लेतील उपक्रमांचे सेलिब्रिटींकडून कौतुक
17153
आंदुर्लेतील उपक्रमांचे
सेलिब्रिटींकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः आंदुर्ले गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सेलिब्रिटी हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर व पृथ्विक प्रताप यांनी भेट दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर उपस्थित होते.
आंदुर्ले ग्रामस्थांनी जल्लोषात व ढोल-ताशांच्या गजरात सेलिब्रिटींचे स्वागत केले. यानंतर तेथील श्री संत गाडगेबाबा प्रार्थना मंदिराला भेट देऊन श्री मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समितीच्या माध्यमातून आंदुर्ले ग्रामपंचायतीला दिलेल्या प्लास्टिक क्रशर मशिनचे सेलिब्रिटींच्या हस्ते उद्घाटन झाले. ग्रामपंचायत व्यायामशाळा व सभागृहातील बचतगटांचे स्टॉल, पेशंट बॅंक, बर्तन बॅंक, शवपेटी अशा लोकसहभागातून झालेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. ग्रामपंचायत सभागृहात काढण्यात आलेली सेलिब्रिटींची पोर्ट्रेट रांगोळी लक्षवेधी ठरली. दशावतार कलाकारांनी केलेले स्वागत व आंदुर्ले-मुणगी महसूल गावातील बचतगटांचे केरसुणी बनवणे या व्यवसायाची मान्यवरांनी प्रशंसा केली. सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

