सुरश्रीच्या विद्यार्थ्यांनी पटकावली पाच पदके

सुरश्रीच्या विद्यार्थ्यांनी पटकावली पाच पदके

Published on

- rat१२p३१.jpg-
P२६O१७१६५
राजापूर ः गीतगायन स्पर्धेतील सुरश्री अकादमीतील यशस्वी विद्यार्थी.
---
सुरश्रीच्या विद्यार्थ्यांचे गीतगायनात यश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ : दीक्षित फाउंडेशन पुरस्कृत, नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ आणि मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौजन्याने वाडा (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या गीतगायन स्पर्धेत राजापूरच्या सुरश्री अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायनाने परीक्षकांसह प्रेक्षकांची मने जिंकत पदकांची लयलूट केली.
स्पर्धेमध्ये सुरश्री अकादमीच्या दहा विद्यार्थ्यांनी अकादमीच्या संचालिका वसुंधरा मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता. या बालकलाकारांनी बालगट आणि कुमार गट अशा दोन्ही विभागांत आपल्या यशाची मोहोर उमटवली. त्यात बालगटात (लहान गट) दुहिता जोशी (विशेष पारितोषिक), सौम्या बावधनकर (तृतीय क्रमांक), अदिश कोरगावकर (प्रथम उत्तेजनार्थ), अभंग मालपेकर (द्वितीय उत्तेजनार्थ) तर कुमार गटात रसिका वायंगणकर (द्वितीय) यांनी पारितोषिके पटकावली. विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळेच अकादमीच्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केल्याचे संचालिका मालपेकर यांनी स्पष्ट केले. स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल राजापूरच्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com