गोगटे महाविद्यालयातील एनसीसी छात्रांचे राष्ट्रीय यश
-rat१२p७.jpg-
P२६O१७१०९
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या राष्ट्रीय शिबिरांमध्ये यश मिळवले छात्रांसह पुढे बसलेले संस्था पदाधिकारी, प्राचार्य.
------------
‘गोगटे’तील एनसीसी छात्रांचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी राष्ट्रीय शिबिरांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
कॅडेट कॅप्टन पार्थ देवळेकर याची स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्पसाठी (जैसलमेर, राजस्थान) निवड झाली. भारतीय सैन्याच्या साऊथर्न कमांड परिसरात कॅम्प झाला. प्रत्यक्ष सैनिकी वातावरणात १२ दिवस भारतीय सैन्यासोबत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणे, हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला.
लीडिंग कॅडेट सार्थक डोर्लेकरने ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प-आयएनएस शिवाजी, लोणावळा येथे यशस्वी सहभाग नोंदवला. देशभरातील विविध डायरेक्टोरेटमधील कॅडेट्ससोबत १२ दिवस चाललेल्या या कॅम्पमध्ये नौदलातील शिस्त, चालण्याची पद्धत, हँडस्विंग व संरक्षण क्षेत्रातील जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवता आली.
लीडिंग कॅडेट यश डोंगरे यांनी याने ऑल इंडिया नौसैनिक कॅम्पमध्ये झालेल्या शिप मॉडेलिंग स्पर्धेत आपल्या संघासह रौप्यपदक मिळवले. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेची लाकडी प्रतिकृती तयार करण्याच्या या स्पर्धेमुळे नौदलाच्या जहाजे व पाणबुड्यांविषयी सखोल माहिती मिळाल्याचे त्याने सांगितले.
----------
चौकट १
यश मिळवणारे छात्र
कॅडेट कॅप्टन पार्थ देवळेकर-स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, राजस्थान (एनआयपी-कास्यपदक, ऑल इंडिया सिंगिंग स्पर्धा- रौप्यपदक), लीडिंग कॅडेट यश डोंगरे- ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प २०२५, आयएनएस शिवाजी, लोणावळा (शिप मॉडेलिंग-ऑल इंडिया रौप्यपदक), लीडिंग कॅडेट सार्थक डोर्लेकर- ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प २०२५, आयएनएस शिवाजी, लोणावळा ऑल इंडिया फायरिंग स्पर्धा-कास्यपदक), कॅडेट आर्यन कांबळे-एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प (तांबरम, तामिळनाडू, सुवर्णपदक). कॅडेट सोहम डोर्लेकर- स्पेशल नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प (काकीनाडा, आंध्रप्रदेश), लीडिंग कॅडेट कल्पेश कोकरे- ऑल इंडिया शिवाजी ट्रेल ट्रेक (पन्हाळा, विशाळगड), कॅडेट पूर्वेश खरात- ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प, केरळ, कॅडेट अथर्व पवार-ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प, (केरळ) या छात्रांनी यश मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

