पाठीवर रत्नागिरीवासीयांची कौतुकाची थाप

पाठीवर रत्नागिरीवासीयांची कौतुकाची थाप
Published on

-rat१२p३९.jpg-
२६O१७१९२
रत्नागिरी : कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धाववंतांचा सत्कार रविवारी येथील विविध संघटनांनी एकत्र येऊन केला. त्या प्रसंगी सत्कारमूर्तींसह संस्थांचे प्रतिनिधी.
---
कोकण कोस्टलमध्ये रत्नागिरीचा ठसा
हाफ मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांचा सत्कार ; विविध संस्थांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे पर्व मोठ्या उत्साहात नववर्षाच्या पहिल्या रविवारी यशस्वीपणे पार पडले. यामध्ये रत्नागिरीतील ६७ धावपटूंनी २१ किलोमीटरची स्पर्धा नियोजित वेळेत पूर्ण केली. याबद्दल आज प्रॅक्टिस रनप्रसंगी येथील विविध संस्थांनी या धाववंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. थिबा पॅलेस रोड येथे हा छोटेखानी कार्यक्रम झाला.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये ३०० शहरांमधून २२०० धावपटू सहभागी झाले. अतिशय कस लावणारा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अनेक धावपटूंचा त्यांच्या त्यांच्या शहरात नागरी सत्कार झाला आणि खऱ्या अर्थाने कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सर्वदूर पोचली. कुठलीही स्पर्धा तेव्हाच मोठी होते जेव्हा त्यात स्थानिकांचा सहभागदेखील मोठा असतो. २२०० सहभागी धावपटूंपैकी जवळपास ३५ टक्के सहभाग रत्नागिरीकरांचा होता आणि ६७ जणांनी हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची दर रविवारी प्रॅक्टिस रन असते. त्या वेळी सत्कार कार्यक्रम झाला. हॉटेल असोसिएशनतर्फे उदय लोध, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन, सुवर्णकार संघटनेचे महेश खेडेकर, क्रिडाईचे अध्यक्ष महेश गुंदेचा, सिटी बॅडमिंटनच्या सरोज सावंत, जैन समाजतर्फे संजय जैन, कऱ्हाडे ब्राह्मणसंघातर्फे मानस देसाई, करसल्लागार असोसिएशनतर्फे उपाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन, केमिस्ट असोसिएशनचे सचिन कोतवडेकर, व्यापारी संघटनेचे अमोल डोंगरे, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गौरव सावंत, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉ. प्रसन्न मुळे यांनी २१ किमी पूर्ण करणाऱ्या धाववंतांचे विशेष कौतुक केले. आता पडला नवीन पायंडा.. ज्या रविवारी कोकण कोस्टल मॅरेथॉन त्याच्या पुढच्या रविवारी धाववंतांचा कौतुक सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com