पाठपुरावा तरीही ‘महावितरण’चे दुर्लक्षच
17270
सतत पाठपुरावा तरीही ‘महावितरण’चे दुर्लक्ष
पडवे-धनगरवाडीतील ग्रामस्थांचा आरोप; वीजप्रश्नी २६ ला आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः पडवे-धनगरवाडी येथील ग्रामस्थ महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा न निघाल्याने, ग्रामस्थांनी थेट प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला उपोषणास बसण्याचा इशारा महावितरणला दिला आहे.
जिल्ह्यात २०१८ मध्ये झालेल्या वादळात धनगरवाडीतील संपूर्ण वीज पोल व वाहिन्या तुटून पडल्या होत्या. त्यानंतर दुरुस्तीच्या नावाखाली केवळ सिंगल लाईनवरून संपूर्ण वाडीला वीजपुरवठा करण्यात आला. तेव्हापासून ग्रामस्थांना सातत्याने वीज खंडित होणे, कमी दाबाचा वीजपुरवठा अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या तर दिवसातून केवळ एक ते दोन तासच, तेही अत्यंत कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीबाबत वारंवार पत्रव्यवहार तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊनही मागील आठ वर्षांपासून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच घडले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर या समस्येला कंटाळून पडवे धनगरवाडीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी महावितरणच्या कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेतली. यावेळी सर्व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सादर करून, २६ जानेवारीला उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला.
---
उपोषणाच्या निर्णयावर ठाम
यावेळी ग्रामस्थ रवींद्र शिंदे यांनी, वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, असे सांगत तहे निवेदन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनाही देण्यात येणार असून, २६ जानेवारीपूर्वी वीज समस्या न सुटल्यास संपूर्ण धनगरवाडी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून रवींद्र शिंदे, विनय शिंदे तसेच भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

