आचरा-पारवाडी दिंडीने पंढरपूर नगरी दुमदुमली
17277
आचरा-पारवाडी दिंडीने
पंढरपूर नगरी दुमदुमली
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १२ ः श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ, आचरा पारवाडी यांच्या दिंडी भजन सादरीकरणाने पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर सादर केलेल्या या दिंडी भजनाने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
या भक्तीमय वातावरणामुळे विठ्ठलाच्या दर्शनासोबतच संत तुकोबारायांचेही जणू दर्शन घडल्याचे भाविकांनी सांगितले. वारकरी वेशभूषेत, विठ्ठल नामाचा गजर करत पावलानृत्यासह सादर केलेल्या दिंडी भजनामुळे परिसर भक्तीमय झाला. या आगळ्या-वेगळ्या सादरीकरणाने पंढरपूरात उपस्थित असलेल्या हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडी भजनात संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारलेले अवि परब यांच्या सशक्त अभिनयामुळे जणू तुकोबा महाराज प्रत्यक्ष अवतरल्याचा भास झाला. या वारीदरम्यान अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे तसेच तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पंढरपूर येथे विठ्ठल चरणी दिंडी लीन झाली. या पवित्र वारीत दिंडी समूहातील एकूण ५३ वारकरी सहभागी झाले होते. या धार्मिक सांस्कृतिक सहलीदरम्यान आचरा पारवाडीतील सर्व भक्तजनांनी पांडुरंगाच्या चरणी आपली सेवा अर्पण करत सेवारूपी दिंडी भजन सादर केले. या संपूर्ण वारीचे व कार्यक्रमाचे नियोजन श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी भजन मंडळ, आचरा पारवाडी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

