कोलझरवासीयांची एकजुट 
आदर्शवत ः परुळेकर

कोलझरवासीयांची एकजुट आदर्शवत ः परुळेकर

Published on

17505

कोलझरवासीयांची एकजुट
आदर्शवत ः परुळेकर

प्रत्येक गावाने अनुकरण करावे

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः सिंधुदुर्गातील जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाला पायबंद घालण्यासाठी कोलझर (ता. दोडामार्ग) येथील ग्रामस्थांनी एकजुटीचा नवा आदर्श समोर ठेवला आहे. गावातील मुख्य देवस्थानासमोर एकत्र येत ‘आम्ही आमची एक इंचही जमीन कुणालाही विकणार नाही,’ अशी ऐतिहासिक शपथ संपूर्ण गावाने घेतली आहे. या धाडसी निर्णयाचे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी स्वागत केले असून, जिल्ह्यातील प्रत्येक गावात अशाच जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
डॉ. परुळेकर यांनी म्हटले, की ‘सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या जमीन खरेदी-विक्रीचा मोठा ‘गोरखधंदा’ सुरू आहे. स्थानिक राजकीय दलालांच्या मदतीने शेकडो एकर जमिनी दिल्लीतील धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मात्र, कोलझरमधील ग्रामस्थांनी घेतलेल्या या शपथेमुळे अशा प्रकारच्या व्यवहारांना आता मोठी खीळ बसेल. ​या आंदोलनात कोलझरमधील तरुण पिढीने दाखवलेल्या एकजुटीचे विशेष कौतुक केले आहे. तरुणांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले असून, हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण सह्याद्री पट्ट्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचणे काळाची गरज आहे.’
‘​उच्च न्यायालयाने संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडीतील १३ गावांमध्ये वृक्षतोड बंदी लागू केली आहे. असे असतानाही कोलझर, सरमळे, कळणे, फुकेरी यांसारख्या गावांमध्ये बेसुमार वृक्षतोड आजही सुरू आहे. या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आता समाजाने जागे होण्याची वेळ आली आहे. जशी शपथ कोलझरमध्ये घेतली गेली, तशीच शपथ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातील देवदेवतांसमोर घेतली जावी आणि ही राक्षसी जमीन खरेदी कायमची बंद व्हावी,’ असेही श्री. परुळेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com