आसमंतचा सागर महोत्सव १५ पासून

आसमंतचा सागर महोत्सव १५ पासून

Published on

‘आसमंत फाउंडेशन’चा उद्यापासून सागर महोत्सव
कांदळवन बोट सहल ; समुद्रकिनारा अभ्यासफेरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे अंबर हॉल येथे १५ ते १८ जानेवारीदरम्यान सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन करण्यात आले आहे. कांदळवन बोटसफारीने महोत्सवाला प्रारंभ होणार असून, त्यानंतर व्याख्याने, खडकाळ किनारा अभ्यासफेरीचेही आयोजन केले आहे.
यात १५ जानेवारीला सकाळी ७ वा. कर्ला जेटी येथून होड्यांमधून खारफुटी जंगलाचा अभ्यासदौरा होईल. यात खारफुटी व किनारी परिसंस्थेची माहितीतज्ज्ञ हेमंत कारखानीस व शांभवी चव्हाण सांगणार आहेत. सायंकाळी भाटकरवाडा परिसरातील शैवाळ, खडकाळ किनारा आदींचा अभ्यास प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. १६ ला महोत्सवाचे उद्‍घाटन सकाळी ९ वा. मुख्य अतिथी म्हणून डॉ. शैलेश नायक यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक डॉ. बबन इंगोले हे समुद्री खनिजसंपत्ती आणि जैवविविधतेवरील परिणाम यावर बोलतील. प्रसिद्ध सागरी पर्यावरणशास्त्र आणि संवर्धनतज्ज्ञ डॉ. आपटे यांची मुलाखत डॉ. अमृता भावे घेतील. त्यानंतर डॉ. संतोष शिंत्रे यांचे पर्यावरण संप्रेषण या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. इशा बोपर्डीकर या सागरी सस्तन प्राणी या विषयावर सादरीकरण करतील.
महोत्सवात १७ ला सकाळी भाट्ये समुद्रकिनारी पुळणी किनारा अभ्यासफेरी आयोजित केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डॉ. नरसिंह ठाकूर हे सागरी संशोधन ते उद्योगविश्व या विषयावर मार्गदर्शन करतील. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ समीर डामरे हे महासागरातील निर्जीव संसाधने या विषयावर सादरीकरण करतील. जबाबदार पर्यटनावरील लघुपट सादर होतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शेखर मांडे यांचे हवामान बदल आणि जनसहभागाची भूमिका या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी भाटकरवाडा येथे खडकाळ किनारा अभ्यासफेरी होणार आहे. यात डॉ. अमृता भावे आणि प्रदीप पताडे मार्गदर्शक आहेत.
-----------
चौकट
१८ला होणार समारोप
महोत्सवाचा समारोप १८ जानेवारीला आहे. या दिवशी सकाळी भाट्ये येथील पुळणी किनारा अभ्यासफेरी होईल. यानंतर शास्त्रज्ञ डॉ. संजय देशमुख हे आपल्या आतला महासागर-स्वप्नातला, सर्व जीवनाला आधार देणाऱ्या अनंत निळ्या रंगाचा शोध घ्या आणि त्याचे रक्षण करा या विषयावर सादरीकरण करतील. दुपारी ‘संगीत कुर्माख्यान’ – मॅंग्रुव्ह फाउंडेशनचे लोकनाट्य होईल. पर्यटन विभागाच्या उपसंचालक, शमा पवार या जबाबदार पर्यटन या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com