विवेकानंदांच्या विचारांची कास धरा

विवेकानंदांच्या विचारांची कास धरा

Published on

swt148.jpg
17692
जांभवडे : युवा दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महेंद्र जाधव. व्यासपीठावर ॲड. रुपाली प्रभू, ॲड. मीनाक्षी नाईक, श्वेता सावंत, अनिल कासले व इतर मान्यवर.

विवेकानंदांच्या विचारांची कास धरा
महेंद्र जाधवः जांभवडेत विधी सेवा प्राधिकरणतर्फे ‘युवा दीन’
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः स्वामी विवेकानंद यांचे जीवन तरुणांना प्रेरणा देणारे आहे. देशाचे भविष्य देशातील युवांच्या हाती आहे. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचे असेल तर उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका. थोर व्यक्तींची पुस्तके वाचण्याचे छंद जोपासा, टी.व्ही., मोबाईलपेक्षा बातम्या पाहा, पेपर वाचा, आध्यात्माचे ज्ञान जोपासा. जिद्द, प्रामाणिकपणा असेल तर यश आपोआपच मिळते, असे प्रतिपादन समुपदेशक महेंद्र जाधव यांनी केले.
महाराष्ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने युवक दिनानिमित्त सोमवारी (ता. १२) न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे येथे शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास समुपदेशक जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. रुपाली प्रभू, ॲड. मीनाक्षी नाईक, विधी सेवा प्राधिकरण लिपिक श्वेता सावंत, न्यू शिवाजी हायस्कूल जांभवडे मुख्याध्यापक अनिल कासले उपस्थित होते.
ॲड. रुपाली प्रभू यांनी मार्गदर्शन करताना मोबाईलपासून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी कशी बाळगावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा व सखी वन स्टॉप सेंटरमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक उमेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास १९० विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com