निरवडे येथील पियुष बर्डे सैन्य दलात ''अग्निवीर''
swt1414.jpg
17761
पियुष बर्डे
निरवडे येथील पियुष बर्डे
सैन्य दलात ‘अग्निवीर’
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः परिस्थितीचे भांडवल न करता जर जिद्द आणि मेहनतीची जोड दिली, तर अशक्य गोष्टही शक्य होते, हेच तालुक्यातील निरवडे येथील पियुष बर्डे या युवकाने सिद्ध करून दाखविले आहे. अत्यंत खडतर परीक्षेत यश मिळवून त्याने भारतीय सैन्य दलात ‘अग्निवीर’ म्हणून स्थान पटकावले आहे. या यशामुळे संपूर्ण तालुक्यात त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पियुषने सुरुवातीला एका प्रशिक्षण ॲकॅडमीतून सैन्य भरतीचे प्राथमिक धडे घेतले. केवळ ॲकॅडमीवर अवलंबून न राहता त्याने स्वअभ्यासावर भर दिला. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत मैदानावर घाम गाळण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत अभ्यासात सातत्य ठेवले. जिद्दीवर आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने भरती प्रक्रियेतील सर्व कठीण टप्पे यशस्वीपणे पार केले.
पियुषचे वडील शेतकरी असून घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्याने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. सामान्य कुटुंबातील मुलाने कोणत्याही सुविधांशिवाय मिळवलेले हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. पियुषच्या या देदीप्यमान यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

