विद्यार्थ्यांच्या व्यापार जत्रेत ४० हजाराची उलाढाल

विद्यार्थ्यांच्या व्यापार जत्रेत ४० हजाराची उलाढाल

Published on

-rat१४p१३.jpg-
२६O१७७३४
राजापूर ः व्यापारजत्रेमध्ये भरवण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी करताना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विक्रांत पाटील, प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, डॉ. अतुल भावे, प्रा. शैलेंद्र प्रभूदेसाई आदी.
----
‘व्यापारजत्रेत’ ४० हजारांची उलाढाल
मराठे महाविद्यालय; २१ स्टॉलवर विविध वस्तूंची विक्री
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे छोटे उद्योग सुरू करून विद्यार्थ्यांनी उद्योजकही बनणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्याची कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी व्यापारजत्रा भरवली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी चटपटीत खाद्यपदार्थ, शितपेये, हस्तनिर्मित भेटवस्तू, गृहसजावट साहित्य, पारंपरिक कोकणी पदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तू यांचे २१ स्टॉल उभारले होते. त्या स्टॉलवर झालेल्या विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची उलाढाल झाली.
मराठे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलेल्या या ‘व्यापारजत्रे’चे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अतुल भावे, प्रा. शैलेंद्र प्रभूदेसाई, प्रा. प्रकाश कोंडसकर, प्रा. प्रणाली तळवडेकर, प्रा. डॉ. सचिन पिंजारी आदी उपस्थित होते.
स्टॉलची विद्यार्थ्यांनी व्यावसायिक पद्धतीने मांडणी केली होती. त्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवल आणि अन्य सुविधांची विद्यार्थ्यांनी ग्रुपनिहाय उभारणी केली. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेत खरेदीही केली.
----
बाजाराचे गणितही समजले
आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलेल्या या व्यापारजत्रेतून विद्यार्थ्यांनी केवळ वस्तूंची विक्रीच केली नाही तर भांडवल गुंतवणूक आणि संघभावनेचे महत्त्वही अंगीकृत केले. मार्केटिंग, हिशोब आणि ग्राहकसेवा याचेही शिक्षण त्यांना मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com