स्वरोत्सवाची सांगता संगीत होनाजी बाळा नाटकाने

स्वरोत्सवाची सांगता संगीत होनाजी बाळा नाटकाने

Published on

-rat१५p१३.jpg -
P२६O१७९१९
संगीत होनाजी बाळा या नाटकातील एक क्षण.
--------
‘संगीत होनाजी बाळा’ नाटकाने ‘स्वरोत्सवात’ रंगत
तपस्या नाट्यनिर्मिती संस्थेचा प्रयोग ; ऑर्गनवादक विलास हर्षे यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः अभिरूची देवरूख आयोजित ‘स्वरोत्सव २०२६’ या वार्षिक संगीत महोत्सवाचा समारोप सावंतवाडी येथील तपस्या नाट्यनिर्मिती संस्थेच्या ‘संगीत होनाजी बाळा’ या अप्रतिम प्रयोगाने झाला. ऐतिहासिक पार्श्वभूमी, सुमधुर गायन आणि नृत्याविष्काराने सजलेल्या या नाटकाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत या तीनदिवसीय महोत्सवाची सांगता केली.
चिं. य. मराठे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन अभय मुळ्ये यांनी केले होते. नाटकातील मुख्य भूमिका असलेल्या होनाजी आणि बाळा यांच्या पात्रांतून स्वप्नील गोरे आणि अभय मुळ्ये यांनी जुन्या काळातील दिग्गज गायक रामदास कामत आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. विशेषतः स्वप्नील गोरे यांनी गायलेल्या श्रीरंगा कमलाकांता या पदाला प्रेक्षकांनी वन्समोअर देऊन दाद दिली. या नाटकात मधुरा लाकडे, बाळ पुराणिक, कैलास दामले, दीप्ती पंडित, संदीप वीरकर व गणेश दीक्षित हे कलाकार होते. नाटकातील संगीताची जबाबदारी विलास हर्षे (ऑर्गन), अभिनव जोशी (तबला) आणि विकास नर (ढोलकी) यांनी समर्थपणे पेलली. विलास हर्षे आणि स्वप्नील गोरे यांचे संगीत मार्गदर्शन नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. अभिषेक कोयंडे यांची प्रकाशयोजना आणि गणेशप्रसाद गोगटे यांच्या पार्श्वसंगिताने प्रसंगांमध्ये जिवंतपणा आणला.
अजरामर भूपाळी घन:श्याम सुंदरा आणि होनाजींच्या शृंगारिक व प्रबोधनपर लावण्यांनी कार्यक्रमात रंगत भरली. या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक आणि ऑर्गनवादक विलास हर्षे यांना सेवा सहयोग पुरस्काराबद्दल अभिरुची संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com