कलाकारांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी
-rat१५p३५.jpg-
P२६O१७९९५
सावर्डे ः प्रसाद राणे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना आमदार शेखर निकम. शेजारी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के.
--------
कलाकारांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी
आमदार शेखर निकम ः सह्याद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये कला प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ : सह्याद्री कला महाविद्यालयाची स्थापना करताना शिक्षणमहर्षी निकम यांनी दूरदृष्टी ठेवली होती. त्यांच्या या दृष्टीमुळे कोकणातील ग्रामीण भागातील कलाकारांना कलाशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
कोकणातील अग्रगण्य चित्र-शिल्पकला महाविद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे यांच्या ३२व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम आज झाला. ते म्हणाले, सह्याद्री शिक्षणसंस्थेत विविध मान्यवर भेट देत असतात. त्यांना कला महाविद्यालय व येथील गॅलरी दाखवली जाते. येथील कलाकृती पाहून पाहुणे थक्क होतात. येथे शिक्षण घेऊन असंख्य कलाकार यशस्वी झाले असून, याचे श्रेय ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के व महाविद्यालयातील प्राध्यापकांना जाते. कलाक्षेत्रात नवनवीन आव्हाने येत असून, विद्यार्थ्यांनी ती पेलण्यासाठी सर्व कौशल्ये आत्मसात करावीत. कलाकार जेव्हा कलाकृतीत सर्वस्व पणाला लावतो तेव्हाच ती कलाकृती बोलकी होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला चित्रकार जयंत कदम, शिल्पकार रोहन पवार, सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे अध्यक्ष प्रकाश अर्जुन राजेशिर्के, माजी सभापती पूजा निकम, युगंधरा राजेशिर्के, अनिरुद्ध निकम आदी उपस्थित होते. या प्रसंगी राणे म्हणाले, कोकणातील भव्य अशा कला महाविद्यालयाकडून सन्मान मिळणे, हे माझे भाग्य आहे. आज कलाशिक्षक काहीसे दुर्लक्षित होत आहेत; मात्र कला व क्रीडाशिक्षक हे शाळेचा आरसा असतात. शासनाने या दोन्ही शिक्षकांना सन्मानाने नियुक्त करावे.
------
चौकट
जीवनगौरव पुरस्काराने प्रसाद राणेंचा गौरव
प्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी देण्यात येणारा शिक्षणमहर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम कला जीवनगौरव पुरस्कार यंदा प्रसाद राणे यांना प्रदान करण्यात आला. राणे हे अनुभवी कलाशिक्षक असून, त्यांनी एसएससी, एटीडी, जीडी आर्ट व एएम असे कलाशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते कणकवली येथील माध्यमिक प्रशाला येथे सहाय्यक शिक्षक (कलाशिक्षक) म्हणून कार्यरत आहेत. कलाक्षेत्रातील त्यांचे योगदान व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन हा सन्मान देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

